युवराज सिंगला मिळाली ग्वाल्हेर विद्यापीठाची ही पदवी युवराज चाहत्यांसाठी खुशखबर | Yuvraj Singh News

2021-09-13 8

युवराज सिंग भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.भारतीय संघातील अष्टपैलू युवराज सिंग बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणजी सामन्यातून माघार घेत त्याने निवड समितीचा रोष ओढावून घेतल्यामुळे देखील युवराज चर्चेत आला. अर्थात या सर्व प्रकारानंतर युवराजचा क्रिकेटचा पुढील प्रवास कसा असेल, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. सध्याच्या घडीला त्याच्या पुनरागमनाबाबत ठाम काही सांगता येत नसले, तरी युवराजच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.
ग्वाल्हेर आयटीएम विद्यापीठाच्या वतीने युवराज सिंगला ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानातील योगदानबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानानंतर युवराजने विद्यापीठाचे आभार मानले. ही पदवी मिळाल्याचा अभिमान वाटतोय या सन्मानामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असून, आगामी काळात ही पदवी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्याने म्हटले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires